Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―पुणे, दि. १ :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग व अन्य खबरदारी घेऊन जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम करण्यात येत आहे.