सोयगाव दि.२२(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या भांडार गृहाला कुलूप न लावता संबंधित भांडार गृह शाळा बंद झाल्यानंतरही खुले आम उघडेच असल्याने शुक्रवारी विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते,दरम्यान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश नागपुरे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरही या कुलूपविना गृहाचा शिक्षण विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला नाही.
सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भांडार गृहाला कुलूप न लावता या वर्गाचे कुलूप उघडेच होते,या भांडार गृहात विना वापरण्यात येणारे भांडे,आणि इतर शिक्षणिक साहित्य पडून आहे.परंतु या भांडार गृहाला कुलूपच नसल्याने शहरात विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.कुलुपाविना उघड्या असलेल्या भांडार गृहातून भांड्यांची चोरीही झाली असल्याचे आरोप व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश नागपुरे यांनी केले असून शिक्षण विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्याचीही तसदी घेतली गेली नसल्याने पुन्हा संशयात वाढ झाली आहे.