आठवडा विशेष टीम―
अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरिबीच्या परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे शक्य नव्हते. ही बाबत पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदत देण्याबाबत आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या. प्रकल्प कार्यालयातर्फे न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात आली व पुढील मोहिमेसाठी आवश्यक मदत अनिलला देण्यात आली.
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो चढाई करण्याकरिता विविध स्पर्धामधून 10 गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. ही टीम 20 जानेवारी रोजी मोहिमेला सुरुवात करुन 26 जानेवारीला भारताचा तिरंगा झेडा तेथे फडकविणार आहे. अनिलने मोहिम यशस्वी करीत जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा व यापुढेही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी युवकाला अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाई करुन जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालण्याची संधी मिळणार आहे. अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिल वसावे यांने शासन तसेच प्रशासनाला धन्यवाद दिले आहे.
0000