आठवडा विशेष टीम― नागपूर, दि. ४ : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्यात. त्यामध्ये त्यांनी ऐतिहासिक दीक्षा भूमीला भेट देवून बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले.
त्यानंतर तेथील चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर फुटाळा तलावाजवळील भगवान बिरसा मुंडा यांच्या तसेच विधानभवन परिसरातील गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश गजभिये व अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.