आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 7 : लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरिता राज्यातील पशुसंवर्धन विभागांर्तगत सुरू असलेल्या व प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राबविण्यात येण्याऱ्या विविध योजनांविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, सहसचिव मानिक गुट्टे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागांर्तगत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य शासनाच्या दुधाळ गायी, म्हैस गट वाटप, शेळी- मेंढी गट वाटप, मांसल कुक्कुट संगोपन करण्यास अर्थसहाय्य यासह विविाध योजनांचा सविस्तर आढावा श्री.केदार यांनी घेतला. ग्रामीण भागातील विकास पशुपालन आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे, याकरीता योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात यावी, असेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.
००००