आठवडा विशेष टीम―
देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. उद्घाटनानंतर महाराष्ट्रात २८५ ठिकाणी व अकोल्यात ३ ठिकाणी लसीकरणाला सुरुवात होईल. प्रत्येक सत्राचे ठिकाणी आधीच ठरविलेल्या १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. पुढील लसीकरणासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होतील. अकोल्यासाठी ९००० डोस उपलब्ध झाले आहेत. या लसीकरणासाठी Covishield ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे व Covaxin ही भारत बायोटेक के. हैद्राबाद यांनी बनविलेल्या लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही लस ०.५ मिली. इतकी हाताचे वरच्या बाजूस स्नायूध्ये दिली जाईल. प्रत्येक लाभार्थ्याला पहिल्या डोसनंतर किमान २८ दिवसांनी २ रा डोस दिल्या जाईल.
ही लस टप्प्याटप्प्याने दिली जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी वैद्यकीय संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर पोलीस दल, लष्कर, महसूल, कर्मचारी, तुरुंग विभाग, नगरपालिका व महानगरपालिका कर्मचारी यांना दिली जाईल. यापुढील टप्प्यामध्ये ५० वर्षांवरील सर्व नागरीक व ५० वर्षाखालील असे नागरिक ज्यांना मधूमेह, उच्चायतदाय, कर्करोग, एच आयव्ही लागण, अशा सारखे आजार असतील त्यांना लस दिली जाईल. सुरुवातीच्या टप्यामध्ये लस मोफत दिली जाईल. नंतरच्या टप्प्याबाबत शासन निर्णय घेईल.
जिल्हा पातळीवरुन कोणत्या लाभार्थ्याला कोणत्या तारखेस व कोठे लस मिळेल याबाबतचा संदेश त्यांचे मोबाईल वर मिळेल. आरोग्य संस्थामधील कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यातील कर्मचारी यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. इतर नागरिकांना मोबाईलवर अॅपवर उपलब्ध करुन दिली जाईल. या अॅपद्वारे प्रत्येक नागरिकाने लसीकरणासाठी स्वतः नोंद करावयाची आहे. आधी नोंद केलेल्या लाभार्थ्यांना लस मिळेल. वेळेवर नोंद करुन घेण्यात येणार नाही.
पहिला डोस दिल्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईल वर तसा संदेश मिळेल त्याचप्रमाणे दुसऱ्या डोसची तारीख देखील मोबाईल वर संदेश देण्यात येऊन कळविण्यात येईल. दोनही डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईलवर QR कोड असलेले प्रमाणपत्र येईल. या प्रमाणपत्राची प्रिंट काढून ठेवता येईल. काही कारणास्तव दिलेल्या तारखेस लाभार्थी उपस्थित राहू न शकल्यास पुढील लसीकरण सत्राचे वेळी त्यांना पुन्हा मोबाईल वर संदेश येईल, असे फक्त ३ वेळा होऊ शकेल. त्यानंतर लसीकरणाबाबत माहिती दिली जाणार नाही. कोविड-१९ ची लस ऐच्छीक आहे. लसीचे २ डोस घेतल्यावर 2 ते 4 आठवड्यात उत्तम प्रतिकार शक्ती येईल. परंतू लसीकरणानंतरही मास्क वापरणे, हात साबणाने किमान २० सेकंद स्वच्छ धुणे व एकमेकापासून ६ फुटाचे अंतर ठेवणे या खबरदारीच्या उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
कोविड-९ ची लस सुरक्षित व प्रभावी आहे. कोणत्याही रोगावरील प्रतिबंधक लस ही १०० टक्के सुरक्षित किंवा प्रभावी नसते. त्याचप्रमाणे याही लसीकरणानंतर तुरळक स्वरुपात इंजेक्शन दिल्याचे जागी दुखणे, जागा लाल होणे, हलका ताप, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. थोड्या उपचारानंतर ही लक्षणे निघून जातात. अगदी क्षुल्लक प्रमाणात गंभीर आजार उद्भवू शकतात. अशा वेळेस तातडीने लसीकरणाच्या ठिकाणी
लाभार्थ्यास अॅड्रीनलीनचे इंजेक्शन देऊन रुग्णालयात पाठविण्याची सोय करण्यात येईल.
आधी कोविड-१९ चा आजार होऊन बऱ्या झालेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. यामुळे चांगली प्रतिकार शक्ती येईल. कोविडची लक्षणे असणाऱ्या लाभार्थ्यांना लक्षणे पूर्णपणे गेल्यावर 14 दिवसांनी लस दिली जाईल.
लसीची साठवणूक करण्यासाठी शासनाकडे उत्तम प्रतीची उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. लस देण्सासाठीची निर्जंतुक सिरींज एकदा वापरल्यावर निकामी होते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नविनच सिरींज वापरली जाते. जितके जास्त नागरिक लस घेतील तितके लवकर आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकू. असे पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, उपसंचालक विभागाचे मुख्य औषधी निर्माण अधिकारी प्रदिप पहाडे, राजेंद्र इंगळे, औषधी निर्माण अधिकारी रामेश्वर मुंडे, सतिष रिठे, जयंत मालोकार, डि.पी. एम. नागदेव भालेराव व लेखाधिकारी दिपक मालखेडे आदि उपस्थित होते.
00000