प्रशासकीयब्रेकिंग न्युज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसंबंधी मार्गदर्शक सूचना

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि.13:- दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी दि. 14एप्रिल, 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

मार्गदर्शक सूचना

१) दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमतात तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड १९चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

२)  या वर्षी कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एका वेळी पाच पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सँनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. तथापि, चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी  मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहाणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

३) दरवर्षी डॉ.बाबासाहेब यांची जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविङ-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कदारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

४) जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

५) राज्यातील कोविड-189विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेचया परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासन स्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५०४०९१२१७१३००२९आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button