अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा अचूक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
रमेश बाबुरावजी आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शासनाने नेमलेल्या वैधमापन खात्याच्या भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात आली.त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीत अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा हा अचूक असल्याचे दिसून आले.वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही.तसा अहवाल वैधमापन खात्याच्या पथकामार्फत देण्यात आला असल्याची माहिती अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश साखरे यांनी दिली आहे.

यंदाचा गळीत हंगाम चालू असून साखर आयुक्त,जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या भरारी पथकाने शुक्रवार,दिनांक 15 जानेवारी रोजी कारखान्यास भेट देवून वजन काट्याची तपासणी केली.सदर तपासणीत अंबाजोगाई साखर कारखान्याचे वजन काटे हे अचूक आढळून आले असून तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश साखरे यांनी दिली आहे.याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,शासनाच्या वैधमापन शास्त्र विभागाकडून दरवर्षी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची पडताळणी केली जाते.त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार विपीन पाटील,वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक मेने,सहायक निरीक्षक,अव्वल कारकून पुरवठा विभाग,लेखापरिक्षक श्रेणी-1 बी.बी.नागरगोजे,साखर कारखान्याचे वजन काटे भरारी पथक सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड,पोलीस किशोर इंगोले,तलाठी विकी आरबाड यांच्या पथकाने अंबासाखर येथे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यास शुक्रवार,दि.15 जानेवारी रोजी भेट दिली आणि कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली.भरारी पथक येण्यापुर्वी शेतक-यांची ऊसाने भरलेली वाहने वजन करून गव्हाणीकडे पाठवण्यात आली होती.त्याचवेळी भरारी पथकाने हीच वाहने परत बोलावून त्या-त्या काट्यावर फेर वजन तपासणी केली असता वजन अचूक आणि तंतोतंत आढळून आले.यास्तव भरारी पथकाने समाधान व्यक्त करून तसा अहवाल कारखान्यास दिला.इतकेच नव्हे तर,ऊस वजनासाठी वापरात असलेले वजन काट्यांची शासनाच्या वैधमापनशास्त्र विभागाकडून पडताळणी व मुद्रांकीत झाले असल्याचे प्रमाणपत्रासह पथकाच्या निदर्शनास आणून दिले.कारखान्याकडे स्वत:ची प्रमाणीत वजने यांची पथकाने दीड तास तपासणी केली असता तंतोतंत वजन दर्शविले.या भरारी पथकाने कारखान्याचे ऊस वजन काटे अचूक असल्याची खात्री करून घेतली.काट्यांच्या तपासणी वेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी देशमुख,केनयार्ड सुपरवायझर,भाई अशोक रोडे,भाई वजीर शेख यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी,तोडणी मजूर,वाहतूक ठेकेदार तसेच अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.