औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: पहिल्याच दिवशी धडकल्या रणरागिणी ग्रामपंचायतीवर ,घोसला येथील प्रकार

घोसला,दि.१९:आठवडा विशेष― ग्रामपंचायतीच्या निकालानंतर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा असतांना मात्र दुसरीकडे मंगळवारी घोसला येथील निवडून आलेल्या रणरागिणी सर्व उमेदवारांसह घोसला गावाच्या विकासासाठी पहिल्याच दिवशी धडकल्या यामुळे मात्र ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.घोसला गावाचा सर्वांगीण विकासासाठी रणांगणात असलेल्या पाच रणरागिणीच्या पाठीशी मतदार धावल्याने या मतदारांना काहीतरी देणे लागतो या उद्देशाने मंगळवारी पहिल्याच दिवशी सुवर्णा ज्ञानेश्वर पाटील,पवित्रा ज्ञानेश्वर पाटील,प्रतिभा पाटील,अलकाबाई बावस्कर,प्रतिभा गवळी,सुभाष बावस्कर,सतीश सोनवणे,सोमू तडवी या आठ उमेदवारांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला पहिल्याच धडकून प्रशासक राजकुमार निकोशे यांचेकडून मागील इतिवृत्तांत समजावून घेतला व आगामी काळातील विकासाचे मुद्दे प्रशासकासमोर उपस्थित करून गावाच्या विकासाची कास धरली आहे.गावात महिलांसाठी सामुहिक शौचालये,गावातील रस्ते,पानंद रस्ते,आरोग्य उपकेंद्र,यासाठी तातडीने काय करता येईल याबाबत चर्चा केली.सरपंच पदाच्या सोडतीची प्रतीक्स्ध न करता या नव्याने निवडून आलेल्या पाच रणरागिणी मात्र सर्वच उमेदवार सरपंच आहे असे समजून थेट विकासासाठी हात पुढे करत असल्याची धडपड घोसला गावात आढळून आली आहे.प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या महिला उमेदवारांसह सर्वच उमेदवारांना निवड झाल्याचे आयोगाचे प्रमाणपत्र घरपोच वितरीत केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.