अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

वडवणी येथे रविवारी जुनी पेन्शन कोअर कमिटीचा मेळावा ,मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना,बीड जिल्हा यांच्या वतीने वडवणी येथे रविवार,दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जुनी पेन्शन कोअर कमिटीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पञकात नमूद करण्यात आले आहे की,01/11/2005 पुर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या शालेय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 1982 ची जुनीच पेन्शन लागु करण्यात यावी यासाठी शासनस्तरावर व सम्यक विचार समिती पुढे हा विषय योग्य प्रकारे मांडून शासनाने तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा या रास्त मागणीसाठी ह्या मेळाव्याचे आयोजन शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याच्या अध्यक्ष सौ.संगिताताई शिंदे (अमरावती),कार्याध्यक्ष शरद तिरमारे (अमरावती),जुनी पेन्शन कोअर कमिटी राज्याचे कार्याध्यक्ष सुनिल भोर (अहमदनगर), प्रा.दिलीप डोंगरे (संगमनेर),सचिन पगार (नाशिक), बालासाहेब इंगळे, महेंद्र हिंगे,सुनिल दानवे,देविदास खेडकर,संजय इघे, संतराम कदम (धुळे), संजय वाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. तरी बीड जिल्ह्यातील 01/11/2005 पुर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या जुनी पेन्शन पीडित बांधवांनी महाराणी ताराबाई माध्य.व.उच्च माध्य.विद्यालय,
वडवणी जि.बीड येथे रविवार,दि.24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन औरंगाबाद विभाग कोअर कमिटीचे व राज्याचे संघटक बालासाहेब इंगळे,बीड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,बीड जिल्हा संघटक मधुकर घुगे,जिल्हा उपाध्यक्ष संजय इंगळे,सचिन पवार, प्रा.बशीर सय्यद,प्रा.बाळासाहेब धनवडे,गोरखनाथ राऊत,नामदेव चांगण,सुरेश शिनगारे, दहिफळे, रांजवण, घो°वे,डोंगरे,पवार,
कराड,पांढरे,परदेशी यांचेसह सर्व पदाधिकारी,सदस्य बीड जिल्हा जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.