आठवडा विशेष टीम―
सातारा, दि. १४ (जिमाका) : उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिड लसीकरण मोहिम चालु असून सदर लसीकरण केंद्रास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली, यावेळी येथील डॉक्टर, नर्स तसेच लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सदरची लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
यावेळी डॉ. संजय कुंभार, डी.बी.जाधव, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, संग्रामसिंह पलंगे, अजित जाधव, प्रमोद पुजारी, सुधीर जाधव, सुधाकर जाधव, दिगंबर भिसे आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करताना कोरोनाच्या काळात रक्ताचा झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बौद्ध बांधवांच्या वतीने उंब्रज येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डी. बी.जाधव, हंबीरराव जाधव, उत्तमराव कांबळे, सरपंच योगराज जाधव, चंद्रकांत जाधव , सोमनाथ जाधव, अजित जाधव, संग्रामसिंह पलंगे, प्रमोद पुजारी, दिगंबर भिसे, नामदेव कांबळे, भिमराव कांबळे, परेशकुमार कांबळे, अतिश बैले आदि उपस्थित होते.