प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २९ : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचेद्वारा सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील युवांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० या वर्षाकरिता १ युवक, १ युवती आणि १ संस्था असे एकून ०३ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत

युवा, युवती पुरस्कार –

(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्षे पुर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असला पाहिजे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  (३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,चित्रफिती, फोटो इ. जोडावेत. (गत तीन वर्षाच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.)

  (४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

  संस्था युवा पुरस्कार

  (१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

  (२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.

  (३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत.

  वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज २६ फेब्रुवारी२०२१ पर्यत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परीसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२-२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.