माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ सदर कार्यान्वित

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 16 : राज्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे.

कोरोना महामारीसारख्या आपत्तीच्या काळात जनतेला वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती मिळण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘लढा कोरोनाशी’ हे नवीन सदर सुरु केले आहे. या सदरांतर्गत कोरोनासंदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय, राज्य आणि जिल्हास्तरीय बातम्या, लेख, दैनंदिन अहवाल एकत्रितरित्या बघता येणार आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.