ब्रेकिंग न्युज

सोयगाव तालुक्यात नव्याने सरपंच पदाची आरक्षण सोडत ,४६ ग्राम पंचायतीसाठी गाव कारभारी ठरले

सोयगाव,ता.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील(युवरे)― सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी नव्याने दुसऱ्यांदा सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती या नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत केवळ अंशतः बदल झाल्याचे आरक्षण सोडतीदरम्यान स्पष्ट झाले असल्याने काही ग्राम पंचायतीचे आरक्षण जैसे थे झाले आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या सरपंच आरक्षणाला धक्का न लागता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली होती यामध्ये आधीच दहा ग्रामपंचायती अनुसूचित जाती-चार आणि अनुसूचित जमाती-सहा याप्रमाणे आरक्षित झालाय असल्याने शुक्रवारी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग यासाठी सरपंच पदासाठी उर्वरित ३६ ग्राम पंचायतीसाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढण्यात आले होते. नव्याने काढण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग यामध्ये ३६ पैकी १८ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात ग्राम पंचायातींवर महिलांचाच बोलबाला आहे.यामध्ये निमखेडी-उमर्विहीरे,वरखेडी(बु)-धनवट,माळेगाव-पिंपरी,जरंडी,हनुमंतखेडा,घानेगावतांडा,फर्दापूर,जंगलातांडा,उप्पालखेडा,वरखेडी(खु),बहुलखेडा,नांदगावतांडा,वाडी सुतांडा,निंभोरा-म्हशिकोठा,जामठी-पिंपळा,शिन्दोल,मोलखेडा आणि सावरखेडा-लेनापूर या ग्राम पंचायती महिलांसाठी खुल्या आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या असून उर्वरित अठरा ग्राम पंचायतीसाठी पुरुषांना संधी मिळाली असून त्यातही महिलांचा समावेश आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात महिला राज येणार आहे.आठ नोव्हेंबरला झालेली आरक्षणातील चार ग्राम पंचायती अनुसूचित जाती आणि सहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायम करण्यात आल्या असून नवीन आरक्षण खालीलप्रमाणे आहे.

आरक्षण सोडत जाहीर झालेल्या ग्राम पंचायती―

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निमखेडी-उमरविहीरे(महिला)वरखेडी(बु)महिला,माळेगाव-पिंपरी(महिला),जरंडी(महिला),हनुमंतखेडा(महिला),घानेगावतांडा(महिला)घोसला(सर्वसाधारण)आमखेडा(सर्वसाधारण),पळसखेडा(सर्वसाधारण),किन्ही(सर्वसाधारण),वनगाव(सर्वसाधारण)वरठाण(सर्वसाधारण)

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    खुला प्रवर्गासाठी आरक्षण खालीलप्रमाणे-

    सावरखेडा-लेनापूर(महिला),मोलखेडा-हिवरी(महिला),शिन्दोल(महिला),जामठी-पिंपाला(महिला),निंभोरा-गलवाडा(महिला),वाडी-सुतांडा(महिला),नांदगावतांडा(महिला),बहुलखेडा,वरखेडी(खु),उप्पलखेडा,जंगलातांडा,आणि फर्दापूर(महिला)आणि खुला प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवार्गाकडे खालील ग्राम पंचायती राखीव झाल्या आहे. गलवाडा-वेताळवाडी,नांदातांडा,काळदरी-दस्तापूर,टिटवी,सावळदबारा,पिंपळवाडी,गोंदेगाव,रवळा-जवळा,निंबायती,वाकडी,पळाशी आणि बनोटी या ग्राम पंचायती सर्वसाधारण गटाकडे गेल्या आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बालक ध्रुव फुसे याने चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढली.यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,मकसूद शेख,सुधीर जहागीरदार,दयानंद जिरगे आदींनी पुढाकार घेतला होता.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.