अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
संभाजी ब्रिगेडच्या शिक्षक,महिला,विद्यार्थी,दिव्यांग,व्यापारी,विद्यार्थी या विविध आघाड्यांच्या परळी, केज,अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी लवकरच होणार आहेत. शनिवार,दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे अंबाजोगाई तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत अशी माहिती संभाजी ब्रिगेड बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेडने बीड जिल्ह्यात पक्ष विस्तार करण्यासाठी नव्याने विविध सामाजिक आघाड्यांची घोषणा केलेली असुन संभाजी ब्रिगेड पक्ष हा बीड जिल्ह्यात सर्वत्र नांवारूपास येत आहे. मागील काही दिवसांपासून विविध सामाजिक प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडने प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलने केलेली आहेत.शेतकरी, कष्टकरी,सर्वसामान्य जनतेचे प्रश्न,विद्यार्थी शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळावा यासाठी न्याय हक्कांसाठी लढा उभा केला आहे.विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे.आवाज उठवला आहे.विविध आघाड्यांवर काम करण्यासाठी तसेच सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील तरूण वर्ग हा संभाजी ब्रिगेड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.त्याच धर्तीवर बीड जिल्हा पुर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी लवकरच अंबाजोगाई,परळी,
केज या तालुक्यातील विविध आघाड्यांवर नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत राजकीय कार्य करण्यासाठी इच्छुक युवक,युवती आणि तरूणांनी विविध पदांवर काम करण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा पुर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे.