अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित मराठी वक्तृत्व स्पर्धेत कु.क्षितीजा मकरंद पत्की या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच सूर्या फाउंडेशन,नवी दिल्ली यांच्या वतीने इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत देशभरातून तृतीय क्रमांक पटकावून एकाचवेळी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उत्तम कामगिरी करून अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल सर्वस्तरांतून तिचे विशेष कौतुक होत आहे.
दोन्ही ही स्पर्धा या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या.सूर्या फाउंडेशन,नवी दिल्ली यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त इंग्रजी भाषेतून राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा पाचवी ते आठवी या ज्युनियर विंग करीता ऑनलाईन पद्धतीने 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2021 या दरम्यान घेण्यात आली.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनेक राज्यांमधून मुलांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचा निकाल 23 जानेवारी 2019 रोजी घोषित झाला असून या स्पर्धेत अंबाजोगाई शहरातील कै.प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची विद्यार्थिनी कु.क्षितीजा मकरंद पत्की हिचा देशातून तिसरा क्रमांक आला आहे.सदरील स्पर्धेचा विषय "लाईफ स्टोरी ऑफ स्वामी विवेकानंद" असा होता.कु.क्षितीजा ही अंबाजोगाई येथील विधिज्ञ अॅड.मकरंद पत्की व प्रा.पूनम पत्की यांची कन्या आहे.एकाच वेळेस मराठी आणि इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत तिने अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकावून अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल केले आहे.क्षितीजाने मिळविलेल्या स्पृहणीय यशाबद्दल तिचे सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.