अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अंबाजोगाईत बसव ब्रिगेडची बांधिलकी ; सुरू केली पाणपोई

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील नगरपालिका परीसरात बसव ब्रिगेडच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून शहरातील यावर्षीची पहिली पाणपोई सुरू करण्यात आली आहे.बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा घेत बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी उन्हाळ्याची चाहूल लागताच यावर्षी अंबाजोगाईतील पहिली पाणपोई सुरू करून अंबाजोगाईतील नागरिकांना,बाहेर गावच्या प्रवाशांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय व्हावी व पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागू नये या उदात्त विचाराने नगरपालिका परिसरात शनिवार,दिनांक ६/०२/२०२१ रोजी पाणपोई सुरू केली.पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना विनोद पोखरकर म्हणाले की, अविनाशजी भोसीकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा मी घेतलेला आहे.माझी बसव ब्रिगेडच्या मराठवाडा अध्यक्षपदी अविनाशजी भोसीकर यांनी निवड केली आणि मला मराठवाड्यात काम करण्याची संधी दिली.यामुळे मी त्यांच्या आदेशानुसार काम करीत आहे व पुढेही करणार आहे.समाजाला माझी जिथे-जिथे गरज पडेल त्यावेळी मी सदैव पुढे असेल,शहरातील विविध प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते आज या पाणपोईचे उद्घाटन करण्यात येत आहे असे पोखरकर म्हणाले.यापूर्वी अंबाजोगाईत विनोद पोखरकर यांचे पुढाकारातून महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव सुरू करण्यात आला.याच धर्तीवर अंबाजोगाई व केज तालुक्यातील 14 गावांमध्ये जयंती उत्सव सुरू झाला.मराठवाड्यातील सर्वांत मोठा 250 सदस्य असलेला पुरूष बचत गट विनोद पोखरकर व मित्र परिवाराने सुरू केला.ते गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच मान्यवर यांचे सत्कार करतात.पुढील काळात विद्यार्थ्यांना मदत,मोफत रूग्णवाहीका आणि बचत गटाचे रूपांतर बँकेत करण्याचा पोखरकर यांचा मानस आहे.विनोद हे कट्टर शिवसैनिक आहेत.ते स्वतःला नेहमीच विविध सामाजिक कार्यात झोकून देतात.शहरातील व ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या असतील यावर ते तोडगा काढण्याचे काम स्वखर्चाने करतात.सर्वसामान्यांसाठी सतत धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.यावर्षीचा पहिला सामजिक उपक्रम म्हणजे उन्हाळ्यात लोकांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने नगरपालिका परिसरात मोफत पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमाकांत पाटील,संपादक अभिजीत गाठाळ,पत्रकार रवि मठपती,पत्रकार नागनाथअप्पा वारद,पत्रकार रणजित डांगे,पत्रकार राम जोशी यांचेसह शहरात पिण्याचे थंड पाणी पुरविणारे युनियनचे सदस्य,शहर व परिसरातील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सुरज आकुसकर,प्रसाद कोठाळे,मनोजकुमार बरदाळे,काशिनाथ तोडकर,गणेश रूद्राक्ष,सचिन गौरशेटे,अमोल व्यवहारे,शिवहार राऊत,सचिन गाढवे, धनंजय महाजन,योगेश पोखरकर यांनी पुढाकार घेतला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.