अंबाजोगाई तालुकापरळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

धम्म चळवळीस सर्वोतोपरी सहकार्य करणार ― आ.संजय दौंड

चांदापुर येथे सातव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप

धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला आहे-पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या धम्म परिषदेला पुज्य भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षीत (औरंगाबाद),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या धम्म परिषदेेचे "सम्यक संकल्प" या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले.

तक्षशिला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे सोमवार,दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे सातव्या धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने झाली. स्वागताध्यक्षपदी प्रा.प्रदिप रोडे हे होते.तर या धम्म परिषदेला परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर तर यावेळी आ.संजय दौंड यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच यावेळी चंद्रशेखर वडमारे,भास्कर रोडे, डॉ.विनोद जगतकर, सरपंच बळीराम मिसाळ,उपसरपंच,
जि.प.बांधकाम विभागाचे अभियंता दत्ताञय भिसे, प्रयागबाई मिसाळ, प्रा.दासुु वाघमारे, परळीभुषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.माधव रोडे यांची उपस्थिती होती.संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले. या प्रसंगी बोलताना आ.संजय दौंड यांनी चांदापुर येथील तक्षशिला बौद्धधम्म प्रतिष्ठाणला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगुन हा परिसर विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देवूत,धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी 25 हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.आपण धम्म चळवळीच्या सदैव पाठीशी असल्याचे त्यांनी नमुद केले.या प्रसंगी पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी चांदापुर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगुन धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी.धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे.यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू,उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले.तर भंते धम्मशील यांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे.बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे.धम्मात दान पारमिता आहे.प्रत्येकाने धम्माचे आचरण करावे असे आवाहन भंते धम्मशील यांनी केले.यावेळी बोलताना भिक्खू ज्ञानरक्षित यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला.भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे.तो वंदनीय बाबासाहेबांनी ञिपीटीकातून घेतला आहे.आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे.या देशाची मानसिकता बदलली पाहिजे.भारतीय लोकशाहीत भीमराज्य टिकवायचे असेल तर यापुढे फक्त भीमराजाचा विसर पडु देवु नका .प्रत्येकाने धम्माचे आचरण केले पाहिजे.धम्म विचारात मोठी ऊर्जा सामावली आहे.धम्म म्हणजे काया,वाचा शुध्द करणे होय.दु:ख नष्ट करणे,शील घडविणे, जसे आपले कर्म तसे आपण घडतो.त्यामुळे आपणच आपल्या सुख,दुःखाला जबाबदार आहोत. आपण कोणत्याही जिवाची हत्या करायची नाही.तर ञिशरण,पंचशील आणि धम्माचे पालन करायचे धम्म विचारांत जगाच्या कल्याणाचे सुख सामावले असल्याचे यावेळी धम्मरक्षित यांनी सांगितले.प्रास्ताविक करताना राजेंद्र घोडके यांनी केले चांदापुर येथील तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांसमोर ठेवली.धम्म परिषदेसाठी नियमीत धम्मदान करावे असे आवाहन केले. स्वागताध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी केले चांदापुर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना अ‍ॅड.अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली.चारित्र्यसंपन्न व नितीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.जगतकर यांनी केले.प्रारंभी गायक बळीराम उपाडे आणि महादेव माने यांनी स्वागतगीत गावून धम्म परिषदेतील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.धम्म परिषदेच्या ठिकाणी तालुका अरोग्य अधिकारी यांच्या वतीने आरोग्य पथक तसेच परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.आरोग्य पथकाने उपस्थित उपासक व उपासिका यांची आरोग्य तपासणी केली.या धम्म परिषदेत 14 विविध महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले.तर धम्म परिषदेचे सुत्रसंचालन जगन सरवदे यांनी करून उपस्थित उपासक,उपासिका यांचे आभार चंद्रकांत इंगळे यांनी मानले.तर धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे,प्रा.प्रदिप रोडे, राजेंद्र घोडके,प्रा. गौतम गायकवाड,राहुल घोडके जगन सरवदे,विश्वनाथ भालेराव,सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे बौद्धाचार्य मुरलीधर कांबळे, माणिक रोडे,मिलींद नरबागे,राज जगतकर, प्रा.बी.एस.बनसोडे, किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे, अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे, हर्षवर्धन वडमारे धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड, रूक्मीण गोरे,सुभाष वाघमारे,बुद्धकरण जोगदंड आदींनी पुढाकार घेतला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.