जिथे विषय गंभीर तिथे सय्यद आबुशेठ खंबीर असाच प्रत्यय जयसिंग नगर वासियांना आज आला
पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा शहरातील प्रभाग चौदा मधील नागरिकांना पाण्यासाठी पळापळ करावी लागत असलयाकारणाने प्रभाग चौदा मधील हातपंपाला चांगले पाणी आहे माञ हातपंप नादुरुस्त असल्यामुळे प्रभाग चौदा मधील नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असे. यामुळे प्रभाग चौदा मधील काही नागरिकांनी ही बाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद आबुशेठ यांच्या समोर माडली. यानंतर तात्काळ सय्यद आबुशेठ यांनी हातपंप दुरुस्त करणाऱ्या विभागाशी संपर्क करून स्वतः उभा राहून प्रभाग चौदा मधील हातपंप दुरुस्त करून घेतला. यामुळे पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या जयसिंग नगर मधील नागरिकांचा थोडा फार पाणी प्रश्न सुटला यामुळे कित्येक दिवसापासून बंद असलेला हातपंप काही तासात दुरुस्त झाल्याने प्रभाग चौदा मधील नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी आबुशेठ धावून आल्याने जिथे विषय गंभीर तिथे सय्यद आबूशेठ खंबीर असाच प्रत्यय पाटोदा नगरपंचायत मधील प्रभाग चौदा जयसिंग नगर वासियांना आला.