ब्रेकिंग न्युज

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11 : मुंबईतील दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.

 

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, आमदार सुनिल प्रभू, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवासन, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

बैठकीत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध रस्त्यांची कामे व रुंदीकरण, पोयसर नदी पात्र विकासातील बाधितांचे पुनर्वसन आणि कुरार नाला विकासातील बाधितांचे पुनर्वसन यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

0000

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.