प्रशासकीयब्रेकिंग न्युज

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. १८ : खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्या १९ एप्रिल २०२१ रोजी ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेत उद्या, १९ एप्रिल  रोजी दुपारी  ४ वाजता  संजय राऊत  विचार मांडणार आहेत.

संजय राऊत यांच्याविषयी…

खासदार संजय राऊत हे प्रसिद्ध पत्रकार, लेखक, चित्रपट निर्माते तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून सर्वपरिचित आहेत. श्री राऊत हे २००४ पासून सलग तिसऱ्यांदा राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत. त्यांनी महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला आहे तसेच राज्यसभेच्या विविध समित्यांवरही उल्लेखनीय कार्य केले आहे.

एक उत्तम लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे . ‘शून्य सारे’, ‘सच्चाई’,’रोखठोक’, ‘मुंबईतील माफिया’, ‘निशाण धरोनी मराठी’, ‘चेकमेट’, ‘अग्रलेख’, ‘सुन्न करणारे दिवस’ आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

श्री. राऊत यांनी १९८० पासून पत्रकार व संपादक म्हणून विविध लेख, अग्रलेख आणि विविध विषयांवर लिखाण केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाची पटकथाही त्यांनी लिहिली आहे.  

समाज माध्यमांद्वारे उद्या व्याख्यानाचे प्रसारण 

सोमवारी, 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे.

तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

 

 

००००

‍रितेश भुयार /वृत्त वि. क्र.११३/दिनांक १८.०४.२०२१

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.