पाटोदा:गणेश शेवाळे― अयोध्येत होत असलेल्या भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभर निधी संकलन मोहिम राबविण्यात येत आहे.माजी आमदार स्व.लक्ष्मण तात्या जाधव यांचे चिरंजीव पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष दादा जाधव यांनी एक्कावन्न हजार निधी श्रीराम मंदीरासाठी पाटोदा शहरातील मंदिर निधी संकलन अॉफीस मध्ये दिला यावेळी गोरेसर सुधाकर गर्जे,सुभाष पाखरे,भरत नागरगोजे,प्रंशात देशमुख यांच्या सह इत्यादी जन उपस्थित होते संतोष जाधव बोलताना मनाले अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होतेय. यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियान मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही माजी सरपंच संतोष दादा जाधव यांनी केले.