बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजमांजरसुंबा

राष्ट्रीय महामार्ग धुळे -सोलापूर , महालक्ष्मी चौकात अपघात टाळण्यासाठी सर्विस रोडसह रमलिंग स्ट्रीप, आय ब्लिंकर बसवण्यासाठी प्रकल्प संचालकासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरींना निवेदन– डाॅ.गणेश ढवळे

लिंबागणेश,प्रतिनिधी महामार्गावरील होणारे वाहनांचे अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र गेवराई अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे ते सोलापूर यावर खालील नमुद केलेल्या ठिकाणी रमलिंग स्ट्रीप व आय ब्लिंकर बसवुन स्पीड लिमिटचे फलक लावणे तसेच बीड शहर लगत महालक्ष्मी चौक याठिकाणी सर्विस रोड करण्यात यावेत अशी मागणी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनाचे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढलेले प्रमाण व मा. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी समितीच्या आढावा बैठकीत वाहनामुळे होणा-या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून वाहनाचे अपघात टाळण्यात यावेत असे आदेश दिलेले आहेत.
महामार्ग पोलिस केंद्र गेवराई अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे ते सोलापूर यामार्गावर खामगाव, बागपिंपळगाव, उमापुरफाटा, तलवडा फाटा, गेवराई बायपास एस्सार पेट्रोल पंपाजवळ, गेवराई बायपास झमझम पेट्रोल पंपाजवळ, वडगाव ढोक शिवार, कन्हैया हाॅटेल, रांजनीफाटा, ब-हाणपुर फाटा, ईटकुर फाटा, हीरापुर, खामगाव फाटा, हिंगणी हवेली फाटा, पेंडगाव, माळापुरी फाटा नामलगाव शिवार, सनराईज हाॅटेल समोर, महालक्ष्मी चौक बीड याठिकाणी गावे, व बाजारपेठा जवळ असल्याने वाहतुकीचे व रहदारीचे प्रमाण जास्त वाढलेले असल्याने सदरील ठीकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, तरी वरील ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी सदर ठिकाणी रमलिंग स्ट्रीप, व आय ब्लिंकर बसवुन व स्पीड लिमीटचे फलक लावून सुरक्षित उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महामार्ग पोलीस कर्मचारी महालक्ष्मी चौकात अपघातात गंभीर जखमी

बीड शहरानजीक बायपास ठिकाणी रहदारी जास्त आहे, मात्र रस्ता रूंदीकरणामुळे वाहने वेगाने जात असल्याने अपघात घडत आहेत, अपघातामुळे जिवितहानी, वित्तहानीसह अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे,बीड शहरात वळणा-या व शहराबाहेरून जाणा-या वाहनांसाठी सर्विस रोड असणे अत्यावश्यक आहे, याच ठिकाणी वर्षभरात 10-12 अपघात झालेले असुन दि.23 डिसेंबर 2020 रोजी गेवराई अंतर्गत महामार्ग पोलिस कर्मचारी कल्याण बाबासाहेब तांदळे आणि राजेंद्र जालिंदर राख यांना याच ठिकाणी पिकअप ने उडवले या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून डोक्याला मार लागलेला आहे, केवळ हेल्मेट असल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही , यापैकी तांदळे महिनाभर झाले अजुनही कामावर रूजु झालेले नाहीत.
याविषयी ग्रामिण पोलीस ठाणे बीड येथे एफ आय आर नंबर 0404 /2020 नोंद करण्यात आलेली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    ―डाॅ.गणेश ढवळे

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.