पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यातील शेवाळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. पदाधिकारी निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज की 13 फेब्रुवारी रोजी निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी योगेश कौतिक पाटील आणि उपसरपंचपदासाठी शांताराम रामचंद्र वाघ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ऐव्ही जाधव यांनी ही निवडणूक बिनविरोध घोषीत केली.यावेळी विशेष सभेला योगेश कौतिक पाटील सरपंच शांताराम रामचंद्र वाघ उपसरपंच त्याचप्रमाणे लताबाई विश्वासराव भोसले जयश्री हरिश्चंद्र भगुरे श्रीकांत कैलास पाटील सुनिता भगवान पाटील भागाबाई बाबुराव मांगारूडी अनिल सुधाकर पाटील नफिसा शब्बीर तडवी असे एकूण नऊ सदस्य उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दैनिक देशोन्नतीच्या तालुका प्रतिनिधी सुनील पाटील पोलीस पाटील अरुण पाटील दिलीप पाटील हनुमंतराव भोसले विश्वासराव पांडे यांनी नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा फा जाधव यांच्यासोबत सहाय्यक ग्रामसेवक संजय वामन जाधव यांनी कामकाज पाहिले.