पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

पाटोदा नगरपंचायत लुटुन खाणाऱ्यांच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते अबलुक घुगे यांचा उपोषणाचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असताना नगरपंचायत प्रशासन गप्प का म्हणून पाटोदा शहरातील यूरिन बॉक्स खरेदी व वृक्ष लागवडी मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून उपोषण करणार - अबलुक घुगे

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा नगर पंचायत मध्ये मुतारी (युरीन) बॉक्स खरेदीत व तसेच वृक्ष लागवडी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चौकशी करण्याचे आदेश देऊनही मुख्याधिकारी यांनी अध्यापन चौकशीला केराची टोपली दाखवली असल्याने नगरपंचायतच्या झालेल्या वरील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी यासाठी दिनांक 23 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अबलुक घुगे सह मुकर्रम पठाण आदींनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला असून याउपरही चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा हि या निवेदनात देण्यात आला आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पाटोदा नगरपंचायत द्वारा तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी यूरिन बॉक्स खरेदीमध्ये नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा गैव्यवहार केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दि.३१ डिसेंबर २०२० रोजी दिले होते. मात्र जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही चौकशी सुरू झाली नसल्याने नगर पंचायत प्रशासनाने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला
केराची टोपली दाखवली आहे.
सध्या पाटोदा नगर पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, तत्कालीन पदाधिकारी यांनी चौकशी दडपण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला ,जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही
या संदर्भात चोकशी होते की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो असे घुगे यांनी वार्ताहरांशी बोलताना पुढे सांगितले की नगर पंचायत पाटोदाने ९ ,८७,५०० / - ( नऊ लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये ) रुपयाचे एकुण २५ नग, प्रति नग दर ३९,५००/ - ( एकोनचाळीस हजार पाचशे रुपये ) दराने खरेदी केले. सदर युरीन बॉक्स एस. एस. इंटरप्राईजेस, नाशिक यांच्याकडुन त्यांची सर्वात कमी दर असल्याकारणाने निविदा मंजुर करुन खेरदी केल्याचे म्हटले आहे. पंरतु नगर पंचायत अॅक्ट नुसार युरीन बॉक्स खेरदीची पेपर जाहिरात दिलेली नाही. ई निविदेत सुध्दा फक्त पर नग दराचा ( किंमतीचा ) उल्लेख आहे . परंतु युरीन बॉक्स कोणत्या दर्जाचा, साईजचा व त्याप्रमाणे किंमत आदी बाबत कोणताच उल्लेख केलेला नाही. ई. निविदाही मॅनेज करुन दर्जाहिन युरीन बॉक्स अवाजवी किमतीत एक नग ३९,५०० रुपयाला खरेदी करुन संगणमताने संबंधीत एजन्सी, अधिकारी, पदाधिकारी यांनी भ्रष्ट्राचार केला आहे. युरीन बॉक्सचे पेंमेंट अदा करण्यापुर्वी ( MKK Consultant Pvt.Ltd . ) डायरेक्टचे युरीन बॉक्स गुणवत्तापूर्ण व योग्य मार्केट रेट असल्याबाबत सर्टीफिकेट घेतले आहे. परंतु कायदेशीर दृष्टया शासकिय गुणनियंत्रकामार्फत याबाबत तपासणी करुन पेमेन्ट अदा करणे गरजेचे आहे . वास्तविक पाहता, खरेदी केलेले युरीन बॉक्स दर्जाहीन, शासनमान्य गुणवत्तापूर्ण लेबल असलेले नाहीत. व ज्यांची किंमत जास्तीत जास्त साडेचार हजार रुपयाच्या पुढे असु शकत नाही . चार ते साडेचार हजार आणि ३९,५०० रुपये खरेदी केलेले बॉक्स जादा दराने घेतल्याचे दिसून येते. बाजारामध्ये नावाजलेल्या ( ब्रनडेड ) कंपनीच्या नंबर १ दर्जाच्या युरीन बॉक्सची किंमत सुध्दा ११,५०० रुपयाच्या पुढे नाही . तसेच एकुण खरेदी केलेल्या युरीन बॉक्सची स्टॉक रजिस्टरला कोठेही नोंद घेतली गेलेली नाही. नव्हे माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत नगर पंचायत अद्यापयपर्यत स्टॉक रजिस्टर मेन्टन केलेले नाही. यापुढे आम्ही मेनटेन करु अशी माहिती दिलेली आहे. एकुण खरेदी केलेले २५ युरीन बॉक्स कोठे बसविले आहे याची माहिती नाही. आवश्यक ठिकाणी बसविले आहे. एवढीच माहिती मिळाली. दर्जाहीन बॉक्स बसविल्याचे दिसते त्या ठिकाणी ना त्यासाठी बेसमेंट ना यूरीन शोषखड्डे केले नाहीत. अशा प्रकारे भ्रष्टाचार केला आहे. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना वरील संदर्भात चौकशी करावी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही चौकशी झाली नसल्याने प्रशासनाने पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अबलुक घुगे व तसेच मुकर्रम पठाण यांनी केला असून दिनांक 16 रोजी दिलेल्या अर्जात येत्या आठ दिवसांत चोकशी पूर्ण न केल्यास दिनांक 23 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे याउपरही चौकशी न झाल्यास आपण अमरण उपोषण करू असाही इशारा दिला आहे तसेच शहरात वृक्ष लागवडीत लाखोंचा भ्रष्टाचार पाटोदा नगर पंचायतने शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड केल्याचे दाखवून जवळपास ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, आजमितीला यातील एकही झाड जिवंत नाही. त्याचं प्रमाणे झाडांना पाणी घातल्याचे दाखवून बील उचलले आहे. याची चौकशी करण्याची मागणी अबलुक घुगे यांनी केली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.