बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजमांजरसुंबालिंबागणेश सर्कल

वर्षभरातच रस्त्याचे तिनतेरा, भ्रष्ट आधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार –डाॅ गणेश ढवळे

मांजरसुंबा:आठवडा विशेष टीम― ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी 25-15 मधून दिलेल्या 23 लाख रूपये रसत्याचे तिनतेरा वाजले असुन निकृष्ट रस्त्याप्रकरणात आधिकारी-ठेकेदारांनी संगनमताने बोगसगिरी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामविकास मंत्र्यासह माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनासुद्धा लेखी तक्रार केली आहे

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ते काळेवाडी रस्ता, यादरम्यान मुळे वस्ती, जाधववस्ती, गिरे वस्ती, आदि एकुण 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीला शालेय विद्यार्थ्यांना शाळेत चिखलातून जावे लागते, तसेच दुधदुभते, पालेभाज्या आणि मुख्यत्वेकरून रूग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी पावसाळ्यात झोळी करून आणावे लागते आदि वस्तीवरील ग्रामस्थांच्या समस्यानंतर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर व विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागत असल्याच्या बातम्या दैनिकातुन प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। मात्र आधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर काम करून निधी घशात घातला

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    वर्षभरातच मोठमोठाल्या भेगा पडल्यामुळे वस्तीकरांची ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार –डाॅ गणेश ढवळे

    वर्षभरापुर्वी केलेले रसत्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून रस्ता केवळ मोठाली खडी अंथरून त्यावर रोलरने योग्य पद्धतीने दबाई करण्यात आली नाही, सिमेंट रस्त्यावर मुबलक पाणी मारण्यात आले नाही त्यामुळे दोनच महिन्यात रस्त्याला भेगा पडु लागल्या होत्या, पावसाळ्यात त्यात पाणी शिरून भेगा मोठ्या झाल्या,70 वर्षानंतर आंदोलनानंतर मिळालेल्या रस्त्याची अवस्था पाहून वस्तिकरांमध्ये संतापाची भावना असून संबधित आधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्तांना केली आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.