क्राईमपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयक

बिडीओ नारायण मिसाळ यांना ३७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

बीड/पाटोदा दि.१७:नानासाहेब डिडुळ― बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३७ हजारांची लाच घेताना बीडोओ मिसाळ यांना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१७ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईने पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना ३७ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.नारायण मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. नारायण मिसाळ यांच्या नगर रोडवरील राहत्या घरी एसीबीचे (अँटी करप्शन ब्युरो) उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे व त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.