Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 19 : ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
समाजातील संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी त्यांनी चित्रपट या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. आपल्या दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा आरसाच समाजासमोर धरला. मनोरंजन क्षेत्राचा हा पैलू उलगडून दाखवून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी वाटही घालून दिली. उत्तम चित्रपट निर्मिती बरोबरच त्यांनी समाजप्रबोधनातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
०००००