बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

पिंपरगव्हाण शिवारातील नविन शेतजमीन मालकाने नरेगा अंतर्गत वृक्षलागवड पेटवून दिली , जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी रोहयो यांना तक्रार –डाॅ.गणेश ढवळे

बीड:नानासाहेब डिडुळ― बीड जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड व वृक्षसंगोपणासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च केला, त्यातच नविन शेतजमीन घेतलेल्या मालकाने जमिनीला कंपाऊंड करण्यासाठी रस्त्यालगत असणारी झाडे पेटवून दिली त्यातच रखरखीत उन्हामुळे वाळलेल्या गवताने पेट घेऊन दूरपर्यंत झाडे जळुन गेली संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्यासह पिंपरगव्हाण ग्रामपंचायत सदस्य दादा शेंदाडे, बाळु कूडके, सचिन आगम, तुकाराम शेंदाडे, संदिप आगाम,प्रदिप आगाम यांनी केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव:- मौजे पिंपरगव्हाण ता.जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत मसोबाफाटा ते साक्षाळपिंप्री रस्त्यालगत 5-6 वर्षापुर्वी मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली होती, 8-10 फुट उंचीची असणारी झाडे, नविन शेतजमीन खरेदी केलेल्या लोकांनी कंम्पाऊंड निर्माण करण्याच्या दृष्टीने पेटवून देण्यात आली यातच वाळलेल्या गवतामुळे आग दूरपर्यंत पसरून वृक्षाचे नुकसान झाले.

नरेगा अंतर्गत वृक्षलागवड जळीत प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
______________________________

जाणीवपूर्वक नरेगा अंतर्गत वृक्षलागवड जळीत प्रकरणात वृक्षहानी करून शासनाचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो बीड यांना करण्यात आली आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.