बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

इंडीयन ऑईल कार्पोरेशने शेतकऱ्यांच्या फळबागेवर फिरवली जेसीबी, न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला डीवायएसपी लगारेनी शिविगाळ करत लाथाबुक्याने केली मारहाण – डाॅ.गणेश ढवळे

बीड:नानासाहेब डिडुळ― इंडियन ऑईल कार्पोरेशन पेट्रोलियम पाईपलाईन टाकण्यासाठी दादागिरी करत कोणताही मोबदला न घेताच फळबाग जेसीबीने पोलीस बंदोबस्तात उद्धवस्त केली, न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतक-याला उपविभागीय पोलीस आधिकारी विजय लगारे यांनी शिविगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जबरदस्ती कागदावर सही घेतली, वरील प्रकरणात मावेजा मिळावा व पोलीस आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, कृषीमंत्री यांना जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक बीड, उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार आष्टी यांना लेखी तक्रार केली आहे.

सविस्तर वृत्त असे की ,आष्टी तालुक्यातील मौजे खाकाळवाडी येथिल रंजना साधु शिंदे यांच्या गट नंबर 164 मधील शेतातुन इंडियन ऑईल कार्पोरेशन पेट्रोलियम पाईपलाईन जात असून त्यांची 14 आर जमिनीतील 3 वर्षापासून लावलेली व सध्या तौर आलेली लिंबोणी व आंब्याची झाडे पोलीस बंदोबस्तात दादागिरी करून कोणताही मावेजा न देताच जेसीबीने दमदाटी करून उखडून फेकली, या संदर्भात तक्रार करण्यासाठी आष्टी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, नंतर डीवायएसपी विजय लगारे यांच्याकडे रंजना शिंदे त्यांच्या मुलासोबत गेल्या असता लगारे यांनी काहीही ऐकून न घेता सागर शिंदे याचा मोबाइल हिसकावून घेतला तसेच त्याला शिविगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जबरदस्ती कागदावर सही करायला भाग पाडले.

अपंग शेतक-यांवर ऑईल कंपनीकडून अन्याय, खाकी वर्दी डागाळली – डाॅ.गणेश ढवळे

सदरक्षणाय खलनिग्रहणाय ब्रिद वाक्य असणा-या वरीष्ठ पोलिस आधिका-याने नुकसानभरपाई मावेजा मागणा-या शेतक-याला न्याय मिळवून देण्याऐवजी शिविगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणण्याची धमकी देत जबरदस्ती कागदावर सह्या करण्यास भाग पाडुन एकंदरीत विजय लगारे यांना शासन पगार देत की इंडियन ऑईल कार्पोरेशन हा प्रश्न पडला असुन याप्रकरणात चौकशी करून लगारे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच शासकीय नियमानुसार फळबाग नुकसानभरपाई कंपनीकडून देण्यात यावी यासाठी तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिला आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.