बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

नरेगा गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाप्रशासनाला वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवक संघटनेतील पदाधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन

बीड:नानासाहेब डिडुळ―
वारंवार निवेदन देऊन व कामबंद आंदोलनाची धमकी देऊन बीड जिल्हा प्रशासनावर दबाव आणणे तसेच वर्तमानपत्रात जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जि. बीड चे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हासरचिटणीस, यांच्यावर महाराष्ट्र जिल्हापरिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल)1964 मधील तरतुदीनुसार व अनुषंगिक नियमांअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्यासह शेख युनुस च-हाटकर जिल्हापरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यातील पंचायत समिती केज अंतर्गत नरेगा कामातील गैरव्यवहार प्रकरणात झालेली चौकशी व त्यात आढळुन आलेल्या सरपंच, ग्रामसेवक तांत्रिक आधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक कार्यक्रम आधिकारी, ऑपरेटर, गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी पं.स.केज मधिल 114 ग्रांमपंचायतमधिल एकुण 474 कर्मचारी व पदाधिकारी यांना चौकशी अहवालाच्या अनुषंगाने नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
परंतु बहुतांश ग्रांमपंचायत मध्ये विविध 1 ते 35 अभिलेखे यांची पुर्तताच नाही, वार्षिक लेख्यांची वेळेवर तपासणी नाही, ग्रांमपंचायतकडून अनियमितता व अपहार निदर्शनास आला तरी वरिष्ठ कार्यालयास तात्काळ अहवाल पाठवला जात नाही, तसेच ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी यांचे GIS अप मध्ये उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2020 मध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन ग्रांमपंचायतीचे सर्व अभिलेखे पुर्ण करण्याचे आदेश असताना ते पुर्ण करण्यात आले नाहीत. त्यामुळेच जाणीवपूर्वक कामचुकार, दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय आधिका-यांनी कारवाई करू नये यासाठी प्रशासनाच्या संभाव्य निर्णय प्रक्रियेत दबाव आणून शिस्तभंग विषयक कारवाई प्रभावित करण्याच्या हेतुने वारंवार निवेदन व दैनिकात जिल्हाप्रशासनाची प्रतिमा मलिन केली जात आहे, त्यामुळेच वरील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह
1) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जि.बीड संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. बळीराम घन:शाम उबाळे, उपाध्यक्ष श्री.मधुकर शेळके, सरचिटणीस श्री. भगवान सिताराम तिडके यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील)1964 मधील तरतुदीनुसार व अनुषंगिक नियमांअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
2)ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी यांचे GIS अप मध्ये उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात यावी.
3)ग्रांमपंचायतमधिल 1 ते 35 अभिलेखे पुर्ण न करणा-या ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
4)ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात यावे
या मागण्यांसाठी जिल्हापरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.