औरंगाबाद दि. 21:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून Break The Chain अंतर्गत 16 एप्रिल रोजी आदेश काढले होते. ह्या आदेशामधील काही सेवांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून बदल करण्यात आलेल्या सेवा वगळता मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशान्वये कळविले आहे. सदरील आदेश दिनांक 20 एप्रिल, 2021 रोजीचे रात्री 08.00 वाजेपासून ते दिनांक 01 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत लागू राहतील.
या आदेशातील खालील नमुद सर्व बाबी हया संपुर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू राहतील.
सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने, सर्व चिकन, मटण, अंडी, मासे, पोल्टूीची दुकाने, कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी औजारे व शेतातील उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने व पावसाळी हंगामासाठी लागणा-या वस्तुंची विक्री करणारी दुकाने व संस्था या आदेशाच्या दिनांकापासून सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहिल.
16 एप्रिलच्या आदेशान्वये मुस्लीम बांधवांचा रमजान महिना लक्षात घेऊन दुध व फळे विक्रीसंबंधी दुकाने पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 1 व दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. मात्र त्याऐवजी सदरची वेळ पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व दुसऱ्या टप्पया सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत या कालावधीत दुकाने चालु ठेवण्यास परवानगी राहिल.
सदर आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिल पासून रात्री 8 वाजेपासून ते 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागु राहिल.
क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये औरंगाबाद जिल्ह्यात खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.
1. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत नमुना FL2 FORM E, FORM व FLW या अनुज्ञाप्तितुन घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल.
2. सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत या कालावधीत नमुना CL-3 अनुज्ञाप्तितुन फक्त सीलबंद बाटलीतुन घरपोच या प्रकाराने मद्यविक्री करता येईल.
3. कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्रीची दुकाने डघडुन Take away किंवा पार्संल पध्दतीने दुकानातुन ग्राहकांस विक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानास भेट देता येणार नाही.
4. मालवाहतुकीचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने मद्य उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्यपुरवठा करण्यासाठी वाहतूक करण्यास परवानगी राहिल.
सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.