डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दि.23 – महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगत संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

यावेळी महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील,महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे आदी अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व नागरिकांना केले.