आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २३ : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या या संकटाला आपण धैर्याने सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा घटना दुर्दैवी आहेत. या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले आहेत.
00000