स्व.प्राचार्य भ.कि.सबनीस यांना अभिवादन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने स्व.प्राचार्य भ.कि.सबनीस यांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे मुख्यप्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रमेश सोनवळकर,प्रकाश बापू सरवदे,प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी स्व.प्राचार्य भ.कि.सबनीस यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सुरेंद्रनाना खेडगीकर,प्राचार्य रमेश सोनवळकर,प्रकाश बापू सरवदे यांनी ही स्व.प्राचार्य सबनीस सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचे स्मरण केले.तर प्रास्ताविक करताना प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर म्हणाले की,स्व.प्राचार्य भ.कि.सबनीस यांनी शिक्षणाबरोबर समाज जागृतीचे मोठे काम केले.पारदर्शी कारभार,स्वच्छ प्रतिभा यामुळे सबनीस सर हे शिक्षण क्षेत्रात लोकप्रिय होते.त्यांच्या कार्याचे सातत्यपूर्ण स्मरण केल्यास शिक्षण क्षेत्रात कार्यरत आजच्या व भावी पिढीसाठी ते दिशादर्शक ठरेल असे प्रा.चौधरी यांनी सांगितले.प्रारंभी श्रीधर काळेगावकर यांनी गायिलेल्या गितातून अभिवादन केले.यावेळी महसुल अधिकारी महेश राडीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.