पाटोदा तालुक्याला अद्यावत आरोग्य सुविधा द्याव्यात – सुशील तांबे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)―
पाटोदा येथे शिवसंग्राम हेल्प लाईन चे काम सुरू करून आठवडा झाला. सुरुवातील फक्त हॉस्पिटल पूर्ती मर्यादित सुविधा आता मोठ्या प्रमाणात जेवण, मास्क वाटप, असहाय पेशंट ला मदत करणे, कोविड सेंटर ला लोकांच्या समस्या सोडवणे. जेवण पोहोच करणे,कुणाला बीड येथे ऑक्सिजन , बेड मिलून देणे किंवा बिल कमी करणे असेल हॉस्पिटल चे अशी कामे करतांना अहमदनगर, पुणे, नगर, नाशिक, मुंबई येथून ही फोन येतात. संघटनेतील कार्यकर्त्यांना सांगून प्रश्न मार्गी लावत आहोत. हे सर्व करतांना पाटोद्यात अद्यावत आरोग्य सुविधा असाव्यात,पाटोद्यात आय सी यु व्हावे अशी सर्व
पाटोदाकरांची इच्छा आहे.प्रशासनाने निवेदन दिल्यावर 30ऑक्सिजन बेड च वॉर्ड सुरू होतोय पाटोद्यात पण अजूनही सिटी स्कॅन, व्हेंटिलेटर, रेदिमिसेविर इंजक्शन, सर्वात महत्वाचे तज्ञ डॉक्टर्स (md) फार गरज आहे. पेशंट कमी होत नाहीत त्यामुळे आरोग्य सुविधा मजबूत करणे फार गरजेचे आहे. काळ फार मोठे संकट घेऊन आलाय. याला सर्वांनी मिळून सामोरे जावे लागेल. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा घरी रहा सुरक्षित राहा काहीही समस्या असल्यास 9359277482 या शिवसंग्राम हेल्प लाईन वर संपर्क करावा असे आवाहन सुशील तांबे तालुका अध्यक्ष पाटोदा यांनी केले.