आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २५ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजन – साजन मिश्र या प्रसिद्ध जोडीतील ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंडित राजन मिश्र यांनी आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान शास्त्रीय गायक, संशोधक व गुरुला मुकला आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.