प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे व्याख्यान

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय चोरमारे यांची ‘गेल्या 60 वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’या विषयावरील व्याख्यानमाला प्रसारित होणार आहे. ही व्याख्यानमाला राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून शनिवार दि. 27 मार्च आणि सोमवार दि. 29 व मंगळवार दि.30 मार्च  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू यांनी या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन केले आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीची पूर्ण झालेली 60 वर्षे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दि.19 मार्च ते  दि.1 मे दरम्यान आयोजित व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत. दि. 17 मार्च रोजी कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय चोरमोरे यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले.  चोरमारे यांच्या ‘गेल्या 60 वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील ही व्याख्यानमालेचे प्रसारण ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.