कडा:शेख सिराज―
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील लहान-मोठे व्यवसाय ठप्प झाले. ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर, गवंडी, बिगारी, ऑटो रिक्षा चालक, सुतार ,लोहार ,कुंभार, मुलानी, नावी यांचे काम बंद असल्याने बारा बलुतेदार यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांना पोट भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बाजार पेठी बंद असल्यामुळे त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदाचा लग्नसराईचा सीजन वाया गेला. अशीच परिस्थिती टेलरची आहे कोणी कपडे शिवण्यासाठी येत नाही. त्यांचा उदरनिर्वाह शिलाई मशीन वरच अवलंबून आहे जवळ असलेली पुंजी संपत आल्याने आता जगायचे कसे त्या चिंतेत बाराबलुतेदार सापडला आहे. बँड पथक कलाकारांचे अतोनात नुकसान होऊन पूर्ण व्यवसाय बुडाला . असून तेही चिंतेत आहेत. सलून चे दुकान बंद असल्याने दुकानाचे भाडे व घर चालवणे मुश्कील झाले . याचबरोबर हातावर पोट असलेले मोटर रिवायडींग कारागीर यांचाही परिस्थिती बिकट झाली. सर्व ग्रामीण भागातील लहान- मोठ्या व्यावसायिकांना शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.