बीड जिल्हा

लॉकडाऊनबाबत तयारी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

आठवडा विशेष मराठी टीम -

मुंबई, दि. 28 : राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीतील मोठे निर्णय

  • प्रशासनाने लॉकडाऊनची तयारी करावी
  • ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा
  • विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा
  • मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे
  • प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी
  • विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
  • सहव्याधी असलेल्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीतून काम करू द्यावे.

बैठकीत आरोग्यमंत्री नक्की काय म्हणाले?
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.