खुंटेफळ वाटेफळ चे भूमिपुत्र कोरोना च्या संकटातून सावरण्यासाठी गावाच्या मदतीला पुन्हा आले धाउन

कडा:शेख सिराज―
महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना महामारी ने थैमान घातलेले असताना बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दररोज कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असताना दिसत आहे.
आपल्या गावातील नागरिक या महामारी तुन सुखरुप व्हावेत या उद्देशाने खुंटेफळ वाटेफळ तालुका आष्टी येथील युवा उद्योजक आणि ज्यांचा पुण्यामध्ये मोठा नावलौकिक आहे.असेपिंपरी चिंचवड भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा वाहतूक आघाडी चे शहराध्यक्ष श्री दीपक भाऊ मोडवे पाटील यांनी मागील वर्षी लॉक डाऊन कालावधीमध्ये गावातील नागरिकांसाठी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर व गहू याप्रमाणे सर्व 200 च्या जवळपास कुटुंब असणाऱ्या एक हजार नागरिकांना तीस क्विंटल साखरेचे व गव्हाचे वाटप केले होते. त्याचप्रमाणे सर्व कुटुंबांना अर्सेनिक अल्बम २ या गोळ्यांचे मोफत वाटप केले होते.
याही वर्षी पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर श्री दीपक भाऊ मोडवे पाटील पुन्हा ग्रामस्थांच्या मदतीला धावून येत आहेत.आमदार सुरेश आण्णा धस यांच्या आष्टी मतदार संघाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दोन दिवसापासून गावातील सर्व कुटुंबांना रोग प्रतिकार शक्ती वाढवणार्‍या अर्सेनिक अल्बम 2 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. खुंटेफळ येथील मोडवे पाटील परिवार हा सदैव जन सेवेमध्ये लोकांच्या अडीअडचणी मध्ये तत्पर असलेला परिवार आहे.
त्याचीच परतफेड म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून एक मुखाने त्यांच्याकडे गावाची सत्ता असते. गावचे सरपंच पद सुद्धा गेली पंधरा वर्ष मोडवे पा. कुटुंबीयांकडे आहे.
कितीही अडीअडचणी मध्ये गावातील कोणत्याही नागरिकांना तो मित्र असो किंवा विरोधक त्यांच्या कुठल्याही मदतीला मोडवे पाटील कुटुंब सदैव तत्पर असते.अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून पुणे येथे नोकरी व्यवसायासाठी गेलेल्या श्री. दीपक भाऊ मोडवे यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर
“” एकझेकेटीव्ह कार रेंटल सर्व्हिसेस”” या फर्म द्वारे पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात जवळपास 500 पेक्षा जास्त चार चाकी वाहने कॉल सेंटर साठी पुरविण्यात येत आहेत.
फक्त व्यवसाय नाही तर भाजप च्या माध्यमातून नेहमीच शहर व गावातील नागरिकांच्या अडचणी मध्ये श्री दीपक भाऊ मोडवे हे वेळोवेळी धावून येत असतात.
याप्रसंगी सरपंच सौ .ज्योती रवींद्र मोडवे पाटील, माजी सरपंच सौ. विजया उद्धवराव मोडवे पाटील, उपसरपंच रमेश अमृते, माजी सरपंच राम सासवडे, माजी सरपंच विठ्ठल राव गुंड, माजी सरपंच उद्धवराव मोडवे पाटील, मा.उपसरपंच राजू वाघमोडे, शशिकांत मोडवे, श्री सुरेश वाळके महाराज, गोपीनाथ वाळके, किरण शेठ मोडवे, आसाराम गुंड, अमोल गुंड , दत्ता गुंड, भैरवनाथ सासवडे, शिवाजी लोखंडे ,दीलीप् मोडवे ,अनिल गाडे फिटर, शरद गुंड, बंडू वाळके ,रावसाहेब गुंड, मोडवे पेंटर,संजय गुंड, साहेबराव बर्डे, र्सोन्याबापू बर्डे, मारुती चौधरी, रावसाहेब कोहक, ह-भ-प शिवा बाबा गुंड, बबलू कुलकर्णी ,राजू पारधे ,सुभाष कोळी, दिगंबर वाळके, दादा बेरड, नारायण मगर, गोरक्ष गुंड, सतीश गुंड व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते याप्रसंगी ग्रामस्थांनी श्री दीपक भाऊ मोडवे पाटील यांचे आभार मानले.