आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पर्यटनातून रोजगाराच्या संधी’ या विषयावर पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरूवार दि. 1 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात पर्यटन वाढीसाठी सुरु करण्यात आलेली गाईड योजना,या योजनेचा विस्तार, राज्यात कृषी पर्यटनासंदर्भात घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय, कृषी पर्यटन, कॅरा व्हॅन धोरण, साहसी पर्यटन धोरण, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, पर्यटन महोत्सव यातून होणारी रोजगार वाढ, आंतरजिल्हा पर्यटन वाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न, सत्तरवरून दहावर आणण्यात आलेले आदरातिथ्य क्षेत्रासाठीचे परवाने, बीच शॅक धोरण त्यातून होणारी रोजगार निर्मिती, होम-स्टे याबाबत माहिती डॉ. धनंजय सावळकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
000