कोरोना विषाणूच्या संसर्ग वाढीने निमखेडीचे ग्रामाथांचे स्थलांतर ,आरोग्यसेवा मिळत नसल्याचा आरोप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

कोरोना संसर्गाचा कमी होत असलेला प्रभाव पुनः वाढत असल्याने निमखेडी ता.सोयगाव गावातील ग्रामस्थांनी चक्क गावातून स्थलांतर करून कुटुंबासह थेट शेतावर मुक्काम मांडला आहे.यामुळे गावात कोरोना विषाणूची मोठी दहशत पसरली असल्याने ग्रामस्थांनी भीतीपोटी गावातून स्थलांतर करून शेर्तावर बस्तान बसविले आहे.मात्र आरोग्य विभागाकडून गावात कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे,नॉन-कोविड रुग्णांवर गावात उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून कोविड संबंधीही आरोग्य विभागाकडून उपाय योजना केल्या नसल्याचा ग्रामास्थाचा आरोप आहे.

निमखेडी ता.सोयगाव गावातील रीन रुग्ण जरंडीचं कोविड केंद्रात तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.अचानक गावात संसर्गाची दाहकता वाढली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरल्याने निमखेडी गावात सन्नाटा पसरला आहे.ग्रामस्थांनी मात्र गावातून स्थलांतर करून शेतावर कुटुंबासह बस्तान बसविले आहे.सोयगाव तालुक्यात तीन दिवसापासून कमी होत असलेली कोरोना संसर्गाची धास्ती पुन्हा वाढली आहे.जरंडीच्या कोविड केंद्रात पुन्हा ३५ रुग्णसंख्या झालेली आहे.निमखेडी गावाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून या गावात मात्र दोन दिवसापूर्वी तालुका आरोग्य विभागाच्या पथकांनी कोविड चाचण्या घेतल्या असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

लसीकरणाबाबत निमखेडीवासियांचा रोष-

निमखेडी ता.सोयगाव गावात अद्यापही आरोग्य विभागाचे कोविड लसीकरण झालेले नसल्याने गावात विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे,गावातून लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांना नियम दाखवून परत पाठविल्या जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे लसीकरणाबाबत निमखेडी वासियांनी रोष व्यक्त केला आहे.ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने गावाच्या धूळ फवारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ग्राम पंचायतीच्या वतीने सांगण्यात आले असून मातर ग्रामस्थांची भीती कमी होत नसल्याने गावातून स्थलांतर सुरूच आहे.

गाव वसले शेती शिवारावर-

कोरोना संसर्गाच्या भीतीने ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली असल्याने निमखेडी गाव आता शेती शिवारावर वसले आहे.त्यामुळे बनोटी कडे जातांना रस्त्यावरून नवीन गाव वसल्याचे चित्र दिसत आहे.