पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील) दि.२७: पहुर येथुन पाचोरा शहरात लग्नसमारंभासाठी येत असतांना मोटारसायकलला ट्रक ने कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शाह बिरादरी च्या विवाह समारंभात येण्यार्या पहुर येथील मयत शे. एजाज शे. नजमुद्दीन (३८) जखमी शे. शाबीर शे. युनुस दोघे राहणार पहुर ता. जामनेर यांचा मालखेडा जवळ आज दि. २७ रोजी सकाळी नऊ वाजता एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने कट मारल्यामुळे दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातानंतर दोघे जखमींना पाचोरा शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शे. एजाज शे. नजमुद्दीन यांचा उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला तर शे. शाबीर शे. युनुस याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचची माहिती मिळताच सामाजीक कार्यकर्ते सचिन सोमवंशी, पहुर येथील शाम सावळे, अरुण घोलप,इक्रामुद्दीन समोद्दीन, वाकोद येथील राजुभाई , शे. सलिम शे. गणी, जि. प. सदस्य अमित देशमुख, आलीम भाई, सल्लाउद्दीन अन्सार आदींनी तात्काळ हॉस्पिटल मध्ये भेट देऊन मदत कार्य केले.
काळाने घात केला
मयत शे. एजाज शे. नजमुद्दीन यांना चार लहान मुले आहेत.पहुर येथील माजी सरपंच इक्रामुद्दीन समोशद्दीन यांचा जवाई आहे तर जखमी शे. शाबीर शे.युनुस हा वाकोद येथील सरपंच आलीमभाई यांचा भाचा आहे. या दोघांच्या अपघातामुळे लग्नाच्या मंडपात स्मशान शांतता झाली. हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.