मुंबई: महाराष्ट्रात भाजप शिवसेना रासप रिपाई युतीची घोषणा करून जागा वाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युतीकडून प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही महाराष्ट्र राज्यात ८ प्रचार सभा होणार आहेत.मुंबईत होणाऱ्या प्रचार सभेत भाजपाचे नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकी ला महिन्यांचा अवधी असतानाच दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युतीची गोळाबेरीज जमवली. तसेच एखादा अपवाद वगळता दोन्ही पक्षांचे जागावाटपही सुरळीतपणे पार पडलं. त्यामुळे आता सेना-भाजप युतीच्या नेत्यांनी प्रचाराकडे लक्ष केंद्रित केले असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर युतीच्या प्रचाराची धुरा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ प्रचार सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा १ एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा येथे होणार आहे. तर मोदींची शेवटची प्रचारसभा मुंबईत होणार आहे. या सभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसेच युती मेळावे आणि सभेनंतर आता फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत.सेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वात जास्त ठिकाणी सभा घेतायाव्यात यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.