“रीनैसंस-द-स्टेट” या पुस्तकांवर तात्काळ बंदी घाला-संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

Last Updated by संपादक

लअंबाजोगाई (वार्ताहर):
” रीनैसंस स्टेट : द अनरीटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र ” या पुस्तकामध्ये गिरिश कुबेर नामक एका लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व चुकीचे लिखाण केले आहे.यामुळे सर्व इतिहास अभ्यासक,संशोधक व महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे या पुस्तकावर तात्काळ बंदी घातली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेड बीड (पूर्व) चे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी सन्माननिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या बाबत संभाजी ब्रिगेड बीड (पूर्व) चे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी सन्माननिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेले जाहीर निवेदन असे की,स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे साहित्यिक होते.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.चारित्र्यसंपन्न व अपार स्वराज्यनिष्ठा,स्वराज्यरक्षक असणा-या राजावर रयतेचे देखिल प्रचंड प्रेम होते.अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे.छञपती संभाजी महाराजांच्या विरोधात तत्कालीन काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी सुडबुध्दीने ज्या पध्दतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला.त्याच पध्दतीने आजही छञपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम कपोलकल्पित कथा,कांदबरी,मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होताना दिसत आहे.परंतु,आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज,छञपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी कदापीही सहन करणार नाही.या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो.कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे.आम्हा सगळ्या इतिहास संशोधक आणि अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.आमची आपल्याला विनंती राहील की, ” रीनैसंस स्टेट : द अनरीटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र ” या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत.जोपर्यंत लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत.गिरीश कुबेर हे छञपती संभाजी महाराजांविषयी आज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही.त्यामुळे कुबेर हे त्यांच्या पुस्तकात जाणीवपूर्वक छञपती संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे,चुकीचे व दिशाहीन लिखाण करतात.या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही सखोल चौकशी झाली पाहीजे.आपण या संवेदनशील विषयामध्ये तात्काळ लक्ष घालावे आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करून बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी.तसेच सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केली आहे.