पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

धनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने ?

बीड़ (नानासाहेब डिडुळ)― पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका शिखरवाड़ी पारनेर ते कुसळंब बर्याच दिवसांनी पासुन चालु आहे
परंतु शिखरवाड़ी ते धनगरजवळका काम चालु झाले असुन कामाला म्हणावी तशी गती येताना दिसत नाही परंतु पण रस्त्याचे काम चालु झाले असुन शिखरवाड़ी धनगरजवळका ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोड़ला असुन भारत स्वातंत्र्य झाल्या पासुन शिखरवाड़ी गावात लालपरी आली नाही रस्ता झाल्यानंतर बस (लालपरी ) आपल्या गावाहुन जाणार त्यामुळे शिखरवाड़ी ग्रामस्थ खुप आनंदी आहेत .
बर्याच दशकापासुन कुटेवाड़ी, शिखरवाड़ी, धनगरजवळका येथील ग्रामस्थांनी गुड़घाभर खड़्यातुन प्रवास केला त्यामुळे त्यांना आत्ता रस्ता कामामुळे दिलासा मिळणार आहे .
या रस्त्यामुळे धनगरजवळका, शिखरवाड़ी, पारनेर, कुटेवाड़ी, गवळवाड़ी कुसळंब तसेच पाटोदा येथे बाजार पेठेसाठी ये जा करणे सोपे होनार आहे .
हा रस्ता व्हावा यासाठी गावातील ग्रामस्थांनी राजमुद्रा संघटना यांनी मोलाचे योगदान दिले .