औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगावला आरोग्य विभागासाठी इच्छुकांच्या मुलखती ,त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

सोयगाव,दि.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यासाठी सोयगाव ला ग्रामीण रुग्णालयासह,जरंडी,निंबायती कोविड केंद्रासाठी विविध पदांची भरती साठी बुधवार आणि गुरुवार दोन दिवस एकूण १५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यासाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकच उमेदवार आल्याने प्रशासन अडचणीत सापडले आहे.

सोयगाव तालुक्यासाठी आरोग्य विभागात विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीचं वतीने वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका,वाहन चालक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माण अधिकारी,सफाई कामगार,भांडारपाल,संगणकपरीचालक यासह इतर पदांसाठी १५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या यासाठी वैद्यकीय अधिकारी-१ अर्ज,आरोग्यसेविका-८,औषध निर्माण अधिकारी-१३,प्रयोगशाळा तंत्रज्ञ-५,सफाई कामगार-८६,ईसीजी-१,वाहनचालक-२६,आणि संगणक परिचालक-७ याप्रमाणे उमेदवार उपस्थित होते गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,या त्रिसदस्यीय समितीने मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे रवींद्र सोनवणे,तालुका आरोग्य कार्यालयाचे अजय डोंगरे यांनी याकामी पुढाकार घेतला होता.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.