सोयगाव,ता.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अतिवृष्टी,अवकाळी,आणि गारपीटच्या नुकसानीतून वगळलेल्या सोयगाव तालुक्याला अखेर उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर कपाशी,मका आणि सोयाबीन या तीन पिकांचा खरीप हंगामाचा पीकविमा मंजूर होण्याची मोठी संधी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यावर आठवडाभरात निर्णय हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे ऐन टंचाई काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोयगाव तालुक्यातील पिकांच्या संरक्षणापोटी बँकेत रक्कम भरलेल्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पिकविम्यासाठी कंपन्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर देण्याच्या जाचक अटी मध्ये सोयगावचा शेतकरी अडकला होता निम्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा संबंधित टोलफ्री क्रमांकावर बोलणे झाले नव्हते त्यामुळे पिकविम्या बाबत सोयगाव तालुक्याला संदिग्धता निर्माण झाली होती परंतु उंबरठा उत्पन्न कमी आल्याच्या माहितीवरून सोयगाव ला पिकविमा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सोयगाव तालुक्यात कपाशी,सोयाबीन आणि मका या पिकांचे उंबरठा उत्पन्न मंडळनिहाय कमी आले असल्याची माहिती गुरुवारी प्राप्त झाल्यावरून मात्र सोयगाव तालुक्याला या तीन पिकांसाठी विमा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या निर्णयामुळे संकटात सापडलेल्य आणि पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बोंडअळींच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उंबरठा उत्पन्न कमी-
खरिपाच्या हंगामात कपाशी पिकांना पहिल्या वेचणीनंतर बोंडअळींच्या प्रादुर्भाव झाल्याने सोयगाव तालुक्यात शंभर टक्के बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्याचे महसूल आणि कृ