बीड:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमतांनी वृक्ष लागवड़ीचे बोगस ठराव बनवण्याचे काम केले ही तक्रार ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कड़े मंगळवारी केली आहे तरी तालुक्यातील घोटाळेबाज सरपंच व ग्रामसेवक यांचे धाबे दणाणले आहे…
पारगाव (घुमरा) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सीईओ अजित कुंभार यांच्याकड़े केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरपंच पती हे ग्रामपंचायत चा कारभार हाकत असुन यापुर्वी सुध्दा त्यांनी दासखेड़ रोड़ला 47 लाखांचे वृक्ष लागवड़ीचे करून बोगस बिले उचलले आहेत पारगाव (घुमरा) सरपंच व ग्रामसेवक यांनी बनावट दस्तावेज तयार करून पंचायत समिती मध्ये पारगाव (घुमरा) ,नफरवाड़ी , अनपटवाड़ी,ढाळेवाड़ी अंतर्गत झाड़े लावण्याचा करोड़ो रूपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाच्या निधीची लुट करण्याचा प्रयत्न केला आहे .
घोटाळेबाज पदाधिकारी व कर्मचार्याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नरसिंग भोसले , कोमल काळे,रंगुबाई गांगुर्ड़े,दत्ताञय पवार यांनी केली आहे चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही त्यांनी दिला आहे.